उषा पानसरे कार्यकारी संपादिका मो. 9921400542
मनसेचे प्रितेश अवघड यांनी दिले वनरक्षक श्री बाला यांना निवेदन..
वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप भड यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह..
मुक्तागिरी स्थित जंगलात सागवान वृक्षांची दिवसा तस्करी…
अचलपूर:-.. प्रादेशिक वनपरिक्षेत्र परतवाडा अधिनस्त येत असलेल्या मुक्तागिरी हद्द प्रारंभ स्थित असलेल्या वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल होत आहे याचे छायाचित्र लावलेले निवेदन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांच्या नेतृत्वात उपवनसंरक्षक श्री बाला यांना देण्यात आले. तसेच, वनपरिक्षेत्र कार्यालय अधिनस्त येत असलेल्या सर्व वनक्षेत्रातील वृक्ष तस्करी ची चौकशी करून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री प्रदीप भड यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी असेही निवेदनात नमूद आहे..
खरपी ते मुक्तागिरी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वनक्षेत्रा मधील करोडो रूपये किमती सागवान वृक्षाची झाडे चोरी गेल्याचे पुराव्यावरून उपवनसंरक्षक यांनी प्रत्यक्ष स्थळी गेल्यावर त्यांच्या निदर्शनास येईल.मुक्तागिरी पर्यटन क्षेत्राकडे जाण्या-येण्यासाठी हाच मुख्य मार्ग असून, मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असतानासुद्धा दिवसा ढवळ्या चोरी होते कशी? याबाबत वृक्षप्रेमी नीही काळजी व्यक्त केली आहे. तसेच, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.प्रदीप भड यांच्या कार्यप्रणालीवर देखी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.श्री भड यांच्या कार्यक्षेत्रात दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यासह इतर असलेल्या भागातील क्षेत्रांमध्येही वृक्षतोडीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने जोर धरत आहे…
________________________
“आर एफ ओ म्हणतात, हि व्यापारी चोरी नाही”..
मुक्तागिरी स्थित वनपरिक्षेत्र अधिकारी परतवाडा कार्यालयाच्या जंगलामधील वृक्ष चोरीबाबत श्री.भड यांना विचारले असता, “ही वृक्ष चोरी व्यापारी चोरी नाही” ती स्थानिक आदिवासींची असेल. असे मत व्यक्त केले. असे प्रितेश अवघड हयांचे म्हणने आहे यावरून हे तर सिद्ध होते कि, चोरी रोखण्यात वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय असमर्थ ठरत असल्यामुळे ते स्थानिक आदिवासींकडे बोट दाखवत असावे असाही अवघड ह्यांचा आरोप आहे
____________________________
“शहरात कोरोना, जंगलात वृक्ष चोरोना”
गेली दोन वर्षात काही महिने सोडले की संपूर्ण परतवाडासह इतरही तालुक्यात लाॅकडाऊन मुळे लोक बाहेर पडू शकली नाही. पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्या प्रकारे कोरोनाने शहरात तांडव घातला होता. त्याचप्रमाणे वृक्ष तस्करांनी जंगलात तांडव घातला असावा असे चोरी झालेल्या शेकडो वृक्षाच्या बुंद्यापासून स्पष्ट होऊ शकते…
____________________________
मुख्य वनसरक्षक प्रादेशिक ज्योती बॅनर्जी यांच्या पुढे वनपरिक्षेत्र कार्यालयाची कैफियत मांडू__ प्रितेश अवघड. जिल्हा उपाध्यक्ष, मनसे …
उपवनसरक्षक श्री बाला यांना रीतसर तक्रार देण्यात आली होती पण त्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारे कारवाई न झाल्याने वन अधिकारी वनांबद्दल किती संवेदनशील आहे यावरून दिसून येते. त्यामुळे प्रादेशिक वनपरिक्षेत्र परतवाडा मधील अनेक उणिवा त्याच्यापुढे मांडून कारवाई कार्यवाही करण्याची मागणी करू असे मत जिल्हा उपाध्यक्ष प्रितेश अवघड यांनी व्यक्त केले..







