Home Breaking News फुलोरा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची संजीवनी ठरणार-मुलभूत क्षमता विकसनावर भर….!

फुलोरा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची संजीवनी ठरणार-मुलभूत क्षमता विकसनावर भर….!

1187

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-दिनांक २५,गट साधन केंद्र पंचायत समिती चामोर्शी येथे इयत्ता पहिली ते सातवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे तालुका स्तरीय फुलोरा प्रशिक्षण टप्पा दोन आज पासून सुरू झाला.सदर प्रशिक्षण हे जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे संकल्पनेतून आणि प्रेरणेतून सुरू आहे.या टप्प्यात प्रशिक्षणाचा लाभ ५२ शिक्षक घेत आहेत.प्रशिक्षण हे दिनांक २५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत चालणार आहे.प्रशिक्षणाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांचे नियंत्रणात प्रशिक्षणाचे सुलभक रमेश किरमिरे,प्रविण धुरके,राजू सोनटक्के हे गट शिक्षणाधिकारी नरेश म्हस्के यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देत आहेत.
प्रशिक्षणाला निवड केलेल्या शाळांचे उपक्रमशील मुख्याध्यापक व शिक्षक स्वच्छेने उत्तम सहकार्य करीत आहेत.तसेच गट साधन केंद्र चामोर्शी येथील साधनव्यक्ती चांगदेव सोरते,विवेक केमेकर, घनश्याम वांढरे,कालीदास डोंगरे,कु सरलक्ष्मी यामसनी,कु वंदना चलाख,विशेषतज्ञ सुशील गजघाटे,व सर्व संसाधन शिक्षक उपस्थित राहुन प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत आहेत.
फुलोरा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध कृत्या, विद्यार्थी उपयोगी उपक्रम,शैक्षणिक साहित्य,आदर्श परिपाठ,भाषा गणित व इंग्रजी विषयातील संबोध,मुलांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या माध्यमातून विविध खेळ,गाणी, गोष्टी इत्यादी सुलभ होण्याच्या दृष्टीने सुलभक मार्गदर्शन करीत आहेत.