भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांचेकडुन नव्या वळण मार्गाची पाहणी.

0
357

 

(चंद्रपूर घुग्घुस ) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

आता जडवाहतुकिसाठी शहरातून नव्हे, तर बहिरमबाबा मंदिराच्या मागुन बायपास.

शनिवार 13 नोव्हेंबर. घुग्घुस शहरातून होणारी जडवाहतुक टाळण्यासाठी वेकोलीकडून नव्याने निर्माण केलेल्या पर्यायी वळणमार्गाची भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांनी आज एकत्रित पाहणी केली.
यावेळी, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलीचे संजय विरमलवार, पिसारेड्डी, ओमप्रकाश फुलारे, संजय वैरागडे, सुदर्शन बल्लेवार हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.

घुग्घुस परिसरातील वेकोलीकडून नव्याने निर्माण केलेल्या जिओसी कोळसा खाण ते बहिरमबाबा मंदिराच्या मागुन बेलोरा पुलापर्यन्त निघणाऱ्या पर्यायी नवीन वळणमार्गाचे निर्माण कार्य पूर्ण होऊन आता जडवाहतूकिसाठी हा रस्ता सज्ज झाला आहे.
याआधी शहरातून कोळशाच्या जडवाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती त्यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास तर होताच परंतु दिवसेंदिवस अपघाताची शक्यता बढावत चालली होती.
त्यामुळे ही वाहतूक शहराच्या बाहेरून व्हावी, अशी घुग्घुसवासीयांची बहुप्रतीक्षित मागणी होती.
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 27 सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक, वेकोलीचे अधिकारी आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत एक बैठक पार पडली. आणि वेकोलीने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी, असा निर्णय झाला. त्यानुसार वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. उदय कावळे साहेब यांचेशी सकारात्मक चर्चा होऊन पर्यायी रस्त्याची शोधाशोध होऊन कामाला सुरवात झाली.
यादरम्यान जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलीचे महाप्रबंधक उदयजी कावळे यांचेसह दोनदा तर भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी वेकोलीच्या अधिकार्‍यांसह स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत अनेकदा याठिकाणी भेटी देऊन कामाचा आढावा घेतला. आता हा नवा पर्यायी रस्ता तयार झाला असून यामार्गे कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक सुरु झाली आहे.
हा पर्यायी रस्ता तयार झाल्याने घुग्घुसवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व वेकोलीचे महाप्रबंधक उदय कावळे यांचे आभार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here