यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
देशाचे विर शिरोमणी क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध करणाऱ्या संभाजी नगर एमआयएम या पक्षाचे खासदार इम्तीयाज जलील यांचा अखिल भारतीय क्षेत्रीय महासभाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरूद्ध कार्यवाही करण्यात यावी या मागणीचे एक लिखित निवेदन यावलचे तहसीदार महेश पवार यांना देण्यात आले आहे . या संदर्भात अखिल भारतीय क्षेत्रिय महासभा ने दिलेल्या निवेदना म्हटले आहे की , छ्त्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे स्वातंत्र्याची मशाल पेटवली असे विर शिरोमणी महापुरुषाच्या अश्वरूढ पुतळयास जिल्हा नियोजन समितीच्या दिनांक ८ / १o / २०२१ अनुपालन अहवाल मुद्दा क्रमांक२८मध्ये मंजुर झालेल्या निधी दुसऱ्या कार्यास लावावा असे पत्रव्यवहार जिल्ह्याचे पालकमत्री यांना देवुन पुतळ्यास विरोध केला असुन , खासदार इम्तीयाज जलील यांनी केलेल्या हिंदुसुर्य विर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या स्मारकास विरोध केल्यामुळे देशाच्या संपुर्ण राजपुत समाजाच्या भावना दुखावल्या असुन , अशा प्रकारे समाजात तेढ निर्माण करून आपल्या राजकारणाची पोळी भाजणाऱ्या लोकप्रतिनिधींचा समस्त राजपुत समाजाकडुन जाहीर निषेध व्यक्त करण्यात येवुन एमआयएमपक्षाचे औरंगाबाद ( संभाजी नगर ) चे खासदार इम्तीयाज जलील यांनी संपुर्ण समाजाशी जाहीर माफी मागुन आपले शब्द आणि स्मारक उभारणी संदर्भात विरोधात दिलेले पत्र मागे घ्यावेत अन्यथा त्यांच्या विरूद्ध राजपुत समाजबांधवांच्या वतीने निव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येवुन त्यांना धडा शिकवला जाईल असा ईशारा ही निवेदनाद्वारे देण्यात आला असुन, या निवेदनावर अखिल भारतीय क्षत्रिय महासभाचे जिल्हा संघटक निलेशसिंह पाटील , यावल तालुका अध्यक्ष तुषारसिंह परदेशी, युवा अध्यक्ष विशाल सिंह पाटील , अखिल भारतीय क्षत्रिप महासभा महीला मोर्चा तालुका अध्यक्ष विद्याताई पाटील , उज्जैनसिंह राजपुत, कृष्णा पाटील , यशपाल सुनिलसिंह वर्मा , मंगलसिंह कैलाससिंह पाटील , ललीत परदेशी , निलेश परदेशी , प्रज्वल पाटील, जगदीश पाटील ,ईश्वर पाटील आदी समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.







