भारतीय बहुऊदेशीय पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय बन्सोड ( ग्रामीण ) व पाशु शेख ( शहर )यांची सर्वानुमते निवड

0
336

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ , महाराष्ट्रची नुतन प्रदेश कार्यकारणी जाहीर झाली असुन, पत्रकार संघाच्या प्रदेश ग्रामीण अध्यक्षपदी विजय धोंडोपंत बन्सोड आणी प्रदेश शहर अध्यक्षपदी पाशु शेख यासिन यांची निवड करण्यात आली आहे . गंगापुर जिल्हा औरंगाबाद येथे नुकतीच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारणी बैठक संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होवुन , वर्ष २०२१ ते २०२२साठीची राज्य कार्यकारणीची निवड करण्यात आली असुन , यात महाराष्ट्र प्रदेश ग्रामीण विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय धोंडोपंत बन्सोड यांची तर प्रदेश शहर विभागाच्या अध्यक्षपदी पाशु शेख यासीन यांची निवड करण्यात आली असुन तर प्रदेश उपाध्यक्षपदी अय्युब मेहबुब पटेल आणी विष्णु अवचार यांची व सचिवपदी जिवन मुरलीधर चौधरी , मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी अलीम चाऊस यांची कार्याध्यक्षपदी प्रा . सुनिल तिजारे , विजय आंनदा जोशी , सुनिल गावडे , संघटकपदी पराग विजय सराफ , कार्यवाहकपदी सलीम रशीद पटेल , नरेन्द्र एफ .सपकाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . गंगापुर येथे संपन्न झालेल्या बैठकीत राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील पत्रकारांच्या विविध अडचणी आणी समस्याबाबत चर्चा करण्यात आली . प्रसंगी देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेले जवान तथा पत्रकारांच्या कुटुंबातील मयतांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली . यावेळी नुतन प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेल्या विजय बन्सोड आणी पाशु शेख आणी प्रदेश उपाध्याक्षपदी निवड झालेले अय्युब मेहबुब पटेल यांचे स्वागत सत्कार संस्थापक अध्यक्ष अय्युब जी पटेल यांच्या हस्ते करण्यात आले तर उपस्थित सर्व पत्रकारांचे आभार प्रदेश सचिव जिवन चौधरी यांनी मानले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here