Home जळगाव भालशिव गांजा लागवड आरोपीस भुसावळ न्यायलयाकडुन मिळाली तिन दिवसाची पोलीस कोठडी

भालशिव गांजा लागवड आरोपीस भुसावळ न्यायलयाकडुन मिळाली तिन दिवसाची पोलीस कोठडी

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

काल तालुक्यातील भालशिव शिवारातील शेतात गांजा लागवड करणाऱ्या संशयीतास अटक करून आज भुसावळ न्यायलयात हजर केले असता त्यास तिन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे . याबाबत मिळालेली माहीती अशी की दिनांक ९ एप्रील रोजी यावल तालुक्यातील भालशिव शिवारात पोलीसांनी गुप्त माहितीच्या अधारावर चौकशी करून केलेल्या कार्यवाहीत चैत्राम गेंदा सोनवणे वय६० वर्ष यांनी स्वताच्या शेतात सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या ४२ किलो ५०० ग्राम गांजाची लागवड केल्याचे आढळुन आल्याने पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने कार्यवाही करीत गांजाची झाडे जप्त करून शेतमालक चैत्राम गेंदा सोनवणे यास अटक केली होती , त्यास आज पोलीसांनी भुसावळ न्यायलयात हजर केले असता न्यायधिशांनी संशयीत आरोपीस १२ एप्रील पर्यंत तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे .