भेंडवळ येथे दोन मावस भावांनी केला जावयाचा खुन तपासात निष्पन्न, दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

0
1180

 

 

BREKING NEWS

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोदः-तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथील मगर नाल्याजवळ बाभूळ वनात एका इसम कुजलेल्या स्थितीत 31ऑक्टोबर रोजीआढळ आला होता. प्रकरणी स्थानिक
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशीला सुरुवात केली असता एक मोठे प्रकरण
समोर आले आहे. दोन मावस भावांनी आपल्या सख्या
जावयाचा मारहाण करून खून केल्याचे पोलिस तपासात
निष्पन्न झाले आहे. मृतदेह हा दगडी पाटे बनवणारा मोताळा येथील रहिवाशी राजीव शामराव मिरटकर, वय २८ वर्ष याचा आहे. मृतकाला पत्नी विमलबाई व तीन मुले होती. गेल्या काही महिन्यांपूर्वी राजू व त्याची पत्नी विमल व रोशननावाचा मुलगा असे तिघे जण दुचाकीने बाशिम येथे जात होते. तर त्याची इतर दोन मुले
घरीच होती. बाशिम येथे जात असताना अचानक त्याचा
अपघात झाला.या अपघातात त्याची पत्नी आणि मुलाचा
मृत्यू झाला हाता. या घटनेनंतर राजूने आपली दोन्ही मुले
नांदुरा येथील आपला साळा सुनील गायकवाड यांच्याकडे
सांभाळण्यासाठी दिले होते. अपघातानंतर राजू मिरटकर हा काही प्रमाणात सावरला होता. त्याने दुसरे लग्न करण्याची विचार केला होता. परंतु याची
भनक राजूचा साळा सुनील गायकवाड यास लागली.
सुनीलची बहिण विमल व तिच्या एका मुलाचे अपघाती
निधन झाल्यानंतर अजून काहीमहिने झाले होते. अशा
परिस्थितीत जावाई राजू दुसरे लग्न करणार असल्याचे
समजतात साळा सुनील गायकवाड याला राजच्या
वागण्याबद्दल शंका येऊ लागली. त्याने दुसरे लग्न
करण्यासाठी पत्नी व मुलाला मारले तर नाही ना, अशी शंका त्याच्या मनात आली. त्यानंतर सुनील याने ही सर्व हकीकत भुसावळ तालुक्यातील कंडारी
येथील आपला मावस भाऊ रमेश रामदास पवार यास
सांगितली. दोघे मावस भाऊ एकत्र आल्यावर त्यांनी संशयातून राजू मिरटकर याचा कायमचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले पोलिस चौकशीत व तपासात रमेशने त्याचा मावसभाऊ सुनिल गायकवाड याचे नाव पुढे आणले. त्यामुळे त्याला देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्याने देखील आपला गुन्हा कबुल केला. 9 ऑक्टोबर रोजी सदर घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शिवारातील भेंडवळ गावाच्या जंगलात घडली होती. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी राजुच्या मृतदेहाचा सांगाडा आढळून आल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. 20 नोव्हेंबर रोजी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला दाखल झालेल्या या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदिप दुनगहू व त्यांचे सहकारी समाधान पाटील यांनी सुरु केला.

सुरुवातीला या गुन्ह्यात रमेश पवार याच्या विरुद्ध बोराखेडी पोलिस स्टेशनला भा.द.वि.365 (अपहरण) नुसार गुन्हा दाखल होता. त्यानंतर तपासात झालेल्या प्रगतीनुसार रमेश पवार आणि सुनिल गायकवाड यांच्याविरुद्ध भा.द.वि.302 (खून), 120 (ब) (कट रचणे), 364 (जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण) अशी कलमे वाढवण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.संदिप दुनगहु व पो.कॉ.समाधान पाटील यांनी पुर्ण केला. तपासकामी हवालदार मोहम्मद अली सैय्यद, पो.कॉ. मोहन पाटील, जितू सोनवणे यांचे सहकार्य लाभले. सध्या या गुन्ह्याचा तपास जळगाव जामोद (जिल्हा बुलढाणा) यांचेकडे वर्ग करण्यात आला असून तपास पोलिस उप निरिक्षक रमेश धामोळे करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here