मुंबई २६ /११च्या भ्याड दहशदवादी हल्ल्यात हिंगोणा गावातील शहीद चौधरींच्या स्मारकावर सैनिक व ग्रामस्थांनी वाहीली श्रद्धांजली

0
345

यावल/Yawal ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

मुंबईच्या२६/११ (mumbai 26/11 terror attack) रोजी दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवान स्व. मुरलीधर लक्ष्मण चौधरी ( Muralidhar Chaudhari)यांच्या शहीद स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

यावल तालुक्यातील हिंगोणा या गावचे रहीवासी शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांचा मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज (CST station Mumbai) रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर कार्यरत असतांना चौदा वर्षापुर्वी २६/११च्या दहशदवादी भ्याड हल्यात नागरीकांचे रक्षण करतांना दहशदवाद्यांशी लढतांना प्रथम गोळी लागून वीरमरण आले होते. अशा हया देशासाठी आपले बलीदान देणाऱ्या शहीद जवानाला आज त्यांच्या मुळ हिंगोणा गावातील त्यांच्या शहीद स्मारकावर आज भावपुर्ण श्रद्धांजलि वाहन्यात आली.

हिंगोणा येथे शहीद मुरलीधर चौधरी यांचे स्मारकावर श्रद्धांजली प्रसंगी दहिगाव येथील पैरामिलेट्री फोर्स वेलफेअर एसोशिएशन यावल तालुका चे अध्यक्ष राजेश जगताप, माजी सैनिकासह उपाध्यक्ष सौखेडा सिमचे माजी सैनिक अय्युब तडवी, सचिव माजी सैनिक मोहन येऊल यांचे सह परिसरातिल सैनिक माजी सैनिका सह हिंगोणा ग्रामपंचायतचे सदस्य शांताराम तायडे, छबू तड़वी आणि जावेद तड़वी सह मोठया संख्येत ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित राहून शहीद सैनिकास श्रध्दांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here