Home Breaking News यवतमाळ जिल्ह्यातील पहिला अपंग हक्क अधिनियम 2016 च्या कायद्या नुसार कलम 92 चा गुन्हा दाखल

यवतमाळ जिल्ह्यातील पहिला अपंग हक्क अधिनियम 2016 च्या कायद्या नुसार कलम 92 चा गुन्हा दाखल

0

 

यवतमाळ अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असुन या संघटनेच्या माध्यमातून अपंग हक्क अधिनियम 2016च्या कायद्या मधील सर्व तरतुदी सक्तीने लागु व्हावे म्हणुनअपंग नेते शेख अनिस पत्रकार हे सतत प्रयत्न करीत आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत उमरी येथील अपंग युवा समाज सेविका यांना गावातील नागोराव टेकाम याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर युवा अपंग समाज सेविका यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली त्या तक्रार नुसार नागोराव टेकाम याच्यावर 214,506,427,504,यानुसार गुन्हे दाखल केले होते.पण अपंग हक्क अधिनियम 2016 नुसार कलम 92 दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे युवा अपंग समाज सेविका यांनी अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांना माहिती देऊन सर्व प्रकार सांगितला. अखेर अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी बोलुन अपंग हक्क 2016च्या कायद्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व नियमानुसार कलम 92 दाखल करा असे संगितले. अखेर अपंग हक्क 2016च्या कायद्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलिस विभागाच्या सहकार्याने कलम 92 चा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
अशी माहिती अपंग जनता दल (सामाजिक संघटना) यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here