यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथील अंकलेश्वर बुऱ्हाणपुर या राज्य मार्गावरील यावल शहराजवळी नदी पुलावरील रस्त्याच्या मध्यभागी मोठया अपघातास आमंत्रण देणारे जिवघेणे मोठमोठे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देणार का असा प्रश्न वाहनधारकांमध्ये उपस्थित करण्यात येत आहे . यावल शहरालगत असलेल्या अंकलेश्वर बु्ऱ्हाणपुर राज्य मार्गावर असलेल्या हडकाई नदीवरील पुलावर मध्यभागी भिषण अपघातास निमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे निर्माण झाले असुन , या खड्डयामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सोसावे लागत आहे . या नदीच्या पुलावरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे खड्डे चुकवितांना अपघात होवुन अवजड वाहने ही पुलाखाली कोसळुन मोठे अपघात होण्याची शक्यता असुन , विशेष म्हणजे या मार्गाने सर्व शासकीय अधिकारी जातात येतात पण या रस्त्याच्या परिस्थितीबाबत कुणीच काही बोलण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे . या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग यावलचे उपविभागीय अधिकारी जे एस तडवी यांच्याशी संपर्क साधुन
माहीती घेतली असता सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले असुन रस्त्याच्या उर्वरीत काही भागातील या नादुरुस्त रस्ताच्या तेवढा भाग हा काँक्रीटीकरणाचा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले आता ते कधी होणार याची आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार आहे दरम्यान तोपर्यंत कुठलाही अपघात या ठिकाणी होवु अशी अपेक्षा करू या .







