यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
,येथील प्रशासकीय पातळीवर कोवीड19च्या लसीकरण मोहीमेस चांगला प्रतिसाद मिळत असुन , पंचायत समितीच्या माध्यमातुन शासनाच्या वतीने प्राप्त होणाऱ्या गावातील विविध शासकीय योजनाची अमलबजावणी करण्यासाठी सदेव तत्पर राहणाऱ्या ग्रामसेवकांना देखील लसटोचणीस सुरूवात झाली आहे . दरम्यान आज यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ग्रामसेवक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष रुबाब तडवी यांनी लस घेवुन या कार्यक्रमाची सुरवात केली , या प्रसंगी ग्रामसेवक व्ही .एल . पाटील , एन व्ही गायकवाड यांच्यासह आदीनी यात सहभाग घेतला . दरम्यान यावल तालुक्यात महसुल , पोलीस , नगर परिषद , पंचायत समिती प्रशासन असे सर्व प्रशासकीय पातळीवर एकुण ७० टक्के जणांनी कोवीड19ची व्हेक्सीनचे लसीकरण लावुन घेतले आहे . या लसीकरण मोहीमेस यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे, डॉ . फिरोज तडवी , डॉ बी बी बारेला , डॉ . मनीषा महाजन , डॉ . गौरव भोईटे , डॉ .नसीबा तडवी यांच्यासह सर्व आरोग्य सेविका कर्मचारी आदी परिश्रम घेत आहे . यावल तालुक्यातील एकुण सहा प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या माध्यमातुन एकुण १३o७ जणांनी लसीकरणाच्या मोहीममध्ये सहभाग घेतला असुन , यात वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सेवक तथा ४५ वर्ष वयोगटा पासुन ५०ते ६० वर्ष वयोगटातील विविध आजाराने ग्रस्त नागरीकांचा देखील समावेश असुन, याप्रसंगी नागरीकांनी कोरोनाच्या लसबाबत पसरविण्यात येत असलेल्या गैरसमजबाबत जागृत राहुन कुणाच्याही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी यांनी केले आहे .







