यावल तालुक्यात विविध ठीकाणी कृषीदुत यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठीची माती परीक्षण मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

0
383

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

गोदावरी फाउंडेशन व्दारे संचलीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदूत आशुतोष मुकेश येवले याने ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत यावल तालुक्यातील यावल शहर ग्रामीण शिवारात माती परीक्षण प्रात्यक्षिक दाखवत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टर उल्हास पाटील माती-पाणी तपासणी प्रयोगशाळा येथून मृदा चाचणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी कृष्णात पाटील राहुल पाटील- सोनवणे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी कृषिदूत आशुतोष मुकेश येवले याने शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कसे अबाधित ठेवता येईल यावर सखोल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सध्याचा मृदेचा होणारा रास व माती परीक्षण शिबिरांची खेडोपाडी असणारी आवश्यकता यावरही येवले यांनी सूतोवाच केले. त्याचबरोबर माती परीक्षण कसे आणि का करावे याचे बहुमोल मार्गदर्शन केले. त्याला प्राचार्य शैलेश तायडे, प्राध्यापक मोनिका नाफाडे-भावसार, प्राध्यापक मोनिका भावसार यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here