यावल येथे आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अर्थ सहाय्याचे धनादेश वाटप

0
445

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तहसील कार्यालयात आज यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावल तहसीलच्या कार्यालयात आज दिनांक १४ जुलै रोजी तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील मयत झालेल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखास प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आलीत या १६ कुटुंबातील कुंटुब प्रमुखांना तिन लाख २० हजार रुपयांचे धनादेश यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते व तहसीलदार महेश पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार सौ . भाग्यश्री भुसावरे , यावल पंचायत समितीचे गटनेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर सोपान पाटील , कॉग्रेस कमेटीचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह पक्षाचे विविध पदावरील कार्यकर्ते उपस्थित होते . या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची नांवे १ ) पुष्पा तुकाराम कोल्हे रा . फैजपुर ता यावल , २ )मनिषा प्रविण कोळी , राहणार हंबर्डी, ३ )विमल मधुकर भोई रा फैजपुर, ४ ) संगीता रविन्द्र मंडवाले , रा . फैजपुर , ५ ) मंगला नथ्थु तायडे , रा . हंबर्डी ,६ ) सुमित्राबाई कैलास पाटील , रा . सांगवी खुर्द , ७ ) मालती गोपाळ भालेराव , रा . सांगवी बु॥ ता . यावल , ८ ) सुनिता सोमा भारुडे , रा . अट्रावल ता . यावल , ९ ) सुंदरबाई वसंत भोई , रा . यावल , १० ) रईसाबी अकील रवान ,रा .यावल, ११ )हसीना मुबारक तडवी, रा . बोरखेडा खुर्द ता . यावल , १२ ) हसनुर अब्बास तडवी , रा . मोहराळा तालुका यावल , १३ ) सुरेखा पुंडलीक कोळी , राहणार यावल , १४ ) फातमा बाई दगडु तडवी , राहणार कोरपावली, १५ )अपशान रशीद तडवी , रा . कोरपावली आणी रविन्द्र मिठाराम सपकाळे , रा . यावल या दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here