यावल येथे बेकाद्याशीर गोवंश वाहतुक करणारे बुलेरो वाहन भुसावळ पाँईटवर पोलीसांनी पकडले वाहनासह चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

0
500

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील चोपडा यावल मार्गावर बेकाद्याशीर गोवंशची वाहतुक करतांना पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीत पकडण्यात आले असुन , वाहन चालक विरूद्ध यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन , वाहन चालकास अटक करण्यात आली असुन वाहन जप्त करण्यात आले आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २ ३ जुन बुधवार रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर कार्यरत असलेल्या पोलीसांनी गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर चोपडया हुन यावल कडे बुऱ्हाणपुर अकंलेश्वर राज्य मार्गावर वरून येणारे वाहन क्रमांक एम एच ४३बी बी ०४०९या बुलेरो वाहनाची पोलीसांनी चौकशी करून तपासणी केली असता या दोन लाख रुपये किमतीच्पा वाहनातुन सुमारे १ लाख१५ हजार रुपये किमतीचे पाच ते सहा वर्ष वयातील ६ बैल (गोवंश ) आढळुन आलीत, दरम्यान यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलेरो वाहनचालक दगडु आंनदा साळुंके वय४० वर्ष राहणार लोहीया नगर चोपडा हा आपल्या ताब्यातील बुलेरो या वाहनातुन ६ बैल हे अत्यंत दाटी दुटीने कोंबुन भरुन चोपडाहुन सावदा येथे कत्तलीसाठी घेवुन जात असतांना आढळुन आल्याने महाराष्ट्र पशु सरंक्षण कायदा कलम१९७६व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कलम अधिनियम१९१५चे कलम ५ ( अ ) (ब) तसेच प्राण्यांना निर्धत्येने वागाविण्या बाबतचे कलम ११ ( ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत असुन , पोलीसांनी वाहन चालकासह वाहन ताब्यात घेतले आहे . या बेकाद्याशीर गोवंश प्राण्यांची वाहतुकीच्या कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल खान पठाण , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले , पोलिस अमलदार राहुल चौधरी , पोलीस अमलदार असलम खान, पोलीस वाहनचालक रोहील गणेश यांनी भाग घेतला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here