यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
येथील शहराच्या भुसावळ टी पाँईट चौकात आज कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतुन स्वराज्य ध्वज कार्यक्रमाअंतर्गत संपुर्ण राज्यात भ्रमण करणारे संदेश यात्रा मोहीमचे यावल शहरात स्वागत व पुजन करण्यात आले . आपला भारत हा समृद्ध व वैभवशाली ऐतिहासिक , सांस्कृतीक परंपरा असलेला देश आहे . कर्जत जामखेडचा खडर्याजवळचा शिवपट्टण किल्ला हा त्यापैक्की एक याच किल्ल्याजवळ हिंदवी खराज्यतील शेवटची लढाई झाली होती आणी शत्रुला धुळ चारत आपल्या शुर मावळ्यांनी त्यावर भगवा फडकवला होता. आता या किल्ल्याच्या आवारात प्रेरणा , ऊर्जा देणारा भव्य असा स्वराज्य ध्वजस्तंभ साकार होत आहे . देशभरातील सर्व महत्वाच्या ठीकाणी प्रातिनिधीक पुजन झाल्यानंतर साडेतिन मुहुर्तापैक्की एक असलेल्या दसऱ्याच्या मुुहुर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना होवुन१५ ऑक्टोबर रोजी हा स्वराज्य ध्वज उभारला जाणार असुन या स्वराज्य ध्वजस्तंभाची उंची ७४ मीटरप, स्तंभाचे वजन १८टन , स्वराज्य ध्वजाचा आकार९६x६४ फुट तर स्वराज्य ध्वजाचे वजन हे ९० किलो आहे . याकरीता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतुन संपुर्ण राज्यात सर्वसमावेशक ध्वजाचे पुजन सर्वांच्या हस्ते व्हावे , अशी लोकभावना असल्यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध ठीकाणी या ध्वजाचे पुजन होणार या दृष्टीकोणातुन ३७ दिवसाच्या या प्रवासात स्वराज्य ध्वज पुजन यात्रा ६ राज्या मुधुन१२ हजार किलोमिटर प्रवास करीत आज या ध्वजपुजन यात्रेचे यावल शहरात आगमन झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले यांनी ध्वजपुजन यात्रेचे पुजन करून यात सहभागी असलेले नितिन खामगळ, नाना गवळी , ऋषी करभाजन, पंकज लोखंडे यांचे स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सुकदेव बोदडे ( नाना ) , डॉ हेमंत येवले , अमोल दुसाने, अब्दुल गनी खान , अरूण लोखंडे , किशोर माळी, यशवंत जासुद, निखिल पाटील , गौरव पाटील , पत्रकार अय्युब पटेल , पत्रकार सुनिल गावडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

