यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी २४ सप्टेंबर शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजेला येथील तहसीलदार महेश पवार यांचे अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीसाठीच्या ऑनलाईन विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावल येथील नगर परिषदच्या तत्कालीन उपनगराध्यक्षा सौ . देवयानी गिरीश महाजन यांनी त्यांचे पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवड होत आहे.
येथील नगर पारिषदचच्या उपनगराध्यक्ष पदासाठी २४ सप्टेंबर रोजी होत असलेल्या निवडीचा कार्यक्रम असा सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे ्यानंतर अर्जांची छाननी दुपारी १२, ३oते १२ , ४५या अर्धा तासात अर्जाची माघार घेणे यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेणे असल्याच्या सुचनांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे पत्र प्राप्त झाले आहे. दरम्यान नगरपरिषदच्या उर्वरीत उपनगराध्यक्षपदाच्या कालावधी करीता नगरसेवक अभीमन्यू विश्वनाथ चौधरी ( हेन्द्री ) यांचे नांव निश्चीत मानले जात आहे .







