राज्यपाल कोशारी आणि भाजपा प्रवक्ते त्रिवेदी विरोधात निषेध आंदोलन पदावरून काढण्याची मागणी

0
175

 

विठ्ठल अवताडे शेगाव

आज स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा संभाजी ब्रिगेड यांच्या कडून निषेध आंदोलन करण्यात आले , छत्रपती शिवराय यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी तथा भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वर कारवाही करून त्यांना पदावरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी करत घोषणा बाजी देऊन कोषारी आणि त्रिवेदी यांच्या बॅनर ल पैदळी तुडवण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश दळवी ,तालुका प्रमुख दत्ता वाघमारे , माजी तालुका प्रमुख रमेश पाटील , माजी नगर सेवक आशिष गणगणे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विठ्ठल अवताडे ,उमेश पाटील अवचार ज्ञानेश्वर निंबाळकर, भूषण मापरी ,युवासेना जिल्हा उपप्रमुख विशाल लहाने शहर प्रमुख शिवा कराळे , युवराज पाटील ,यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here