Home वर्धा रामनवमी निमित्य राष्ट्रवादी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शोभायात्रेचे स्वागत व शरबत वाटप.

रामनवमी निमित्य राष्ट्रवादी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शोभायात्रेचे स्वागत व शरबत वाटप.

 

हिंगणघाट :- रामनवमी निमित्य राष्ट्रवादी चौक हिंगणघाट येथे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री.अतुल वांंदिले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरबत वाटपचा कार्यक्रम करण्यात आला.
तसेच शहरातील निघालेल्या पालखी शोभायात्रेचे अतुल वंदिले यांच्या नेतृत्वात दुपट्टा देऊन स्वागत केले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,अमोल बोरकर, सुनील भुते,अमोल मुडे,राजू मुडे, प्रवीण भुते, प्रवीण श्रीवास्तव,अनिल भुते, अजय परबत,राहुल जाधव, जावेद मिर्झा, गोमाजी मोरे,पंकज भट्ट,राजू मिसेकर, संजय गायधने,राहुल बोरकर, सागर बारई,मिथून चौहान, आशिष ठाकरे,निखिल शेळके, स्वप्नील पांडे, निखिल ठाकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा