Home Breaking News लग्नखर्चाला फाटा देत अभ्यासिकेला 10000 रु ची मदत: सचिन आणि पूनम चे...

लग्नखर्चाला फाटा देत अभ्यासिकेला 10000 रु ची मदत: सचिन आणि पूनम चे स्वागतार्ह पाऊल

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

खुमगाव येथील श्री अशोक सुखदेव वावगे यांचे चिरंजीव सचिन, व पान्हेरा येथील श्रीराम सखाराम राखोंडे यांची कन्या चि.सौ.कां. पूनम, यांचा शूभविवाह दि. 15 मार्च 2021 रोजी पान्हेरा येथे संपन्न झाला. महापुरुषांना आदर्शस्थानी मानणाऱ्या या नवदाम्पत्याने लग्नातील खर्चाला फाटा देत खुमगावात येथे लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या अभ्यासिकेला मदत देण्याचा आदर्श निर्णय घेतलाय. आज गावात प्रवेश करताच आधी अभ्यासिकेला 10000 रु ची मदत देऊन एक सामाजिक काम करूनच सचिन आणि पूनमताई यांनी गृहप्रवेश केला. गावातील नवीन पिढी शिकावी म्हणून शेतकरी कुटुंबातील नवदाम्पत्याने बाळगलेल्या या भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.