लोणी(टाकळी)येथे अपंग माहिती ,मार्गदर्शन व मदत केंद्राचे उद्घाटन.

0
426

 

अपंग नेते शेख अनिस पत्रकार याचा हस्ते

अमरावती, अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अराजकीय सामाजिक संघटना असुन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अपंगाचे न्याय व हक्काचे कार्य सुरु असून शासकीय योजना व सवलतींची अपंगांना माहिती मीळावी म्हणून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडे.तालुका येथील लोणी(टाकळी)येथे अपंग माहिती, मार्गदर्शन व मदत केंद्र चे उदघाटन अपंग नेते शेख अनिस पत्रकार याचा हस्ते करून सुरु करून अपंगांना योजना व सवलतींचा लाभ मीळावा म्हणून हे केंद्र खुले करून अपंगांना मदत मिडेल अशी माहिती अपंग सेवक सुधाकरजी काळे यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष मयुर मेश्राम, प्रदेश महासचिव राजीक शाह,अपंग मार्गदर्शक राहुल वानखडे, शेख रुस्तुम, अनवर शाह,सिध्दार्थ किर्दक,शरद गणवीर, संदिपभाऊ,मुतलीक चाऊस आदी अपंग बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here