Home वर्धा Murdernews /रेती घाटाच्या ९८ लाखांच्या व्यवहारातून थरारक खून; रंगपंचमीला पाच आरोपी गजाआड

Murdernews /रेती घाटाच्या ९८ लाखांच्या व्यवहारातून थरारक खून; रंगपंचमीला पाच आरोपी गजाआड

0
823

← Back

Thank you for your response. ✨

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

Breakingnews /वर्धा : वर्धा नदीतील बामर्डा रेती घाटाच्या कोट्यवधींच्या व्यवहारातून उफाळलेला वाद अखेर रक्तरंजित शेवटाला पोहोचला. ९८ लाख रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून पेटलेल्या संघर्षात भरत दयानंद नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रंगपंचमीच्या दिवशी पोलिसांनी धडक कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. नाशिक येथून अक्षय खडसे, सौरभ ठाकूर आणि अमोल कामडी यांना वर्धा गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले. तर नितीन कामडी व शेखर वांदीले यांना वरोरा पोलिसांनी अटक केली.

यापूर्वी सुनील झोरे, प्रफुल उमाटे आणि अतुल मोटघरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासानुसार, नागपाल यांच्यावर तलवारीने वार करून अमानुष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत नदीपात्रात फेकून देण्यात आल्याचा आरोप आहे.

Murdernews /या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here