वाळुची चोरटी करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांवर तहसीलदार महेश पवार यांच्या कारवाई

0
433

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील महसुलच्या पथकाने केलेल्या अवैद्य गौण खनिजची बेकायद्याशीर वाहतुक करीत असतांना दोन वाळुची चोरटी करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांवर तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये कार्यवाही करण्यात येवुन वाहन जप्त करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक ५ एप्रिल रोजी बुधवार भालशिव पिंप्री घाटशिवारातुन दुपारी २ ,३० वाजेच्या सुमारास अवैद्यरित्या विनापरवाना गौण खनिज वाळुची वाहतुक करतांना गणेश महाजन यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४३एल११ooआणी एजाज देशमुख यावल यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९पी१७१९हे वाहन यावल नगर परिषदच्या शेजारी महसुलच्या मंडळ अधिकारी शेखर तडवी भाग यावल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक ईश्वर कोळी तलाठी यावल , विरावली तलाठी मारोडे, यावल कोतवाल निलेश गायकवाड यांच्या पथकाने गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर सापळा रचुन विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना पकडण्यात आले असुन , सदरचे दोघ ही ट्रॅक्टर वाहन ही दंडात्मक कार्यवाही कण्यात आले आहे . तहसीलदार महेश पवार यांनी नियुक्त केलेल्या वाळु माफीया विरूद्धच्या भरारी पथकाव्दारे होत असलेल्या धडक कार्यवाही मुळे वाळु माफीयावर चांगलेच वचक निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here