जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्रतिपादन.
अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक.
गडचिरोली:-आज दिनांक १९ ऑगस्ट रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने फुलोरा उपक्रमात समाविष्ट असलेल्या शिक्षकांसाठी यु-ट्युबवर ऑनलाइनद्वारे सभा आयोजित करण्यात आली होती.फुलोरा उपक्रम हा मुलांचा अध्ययन क्षमता विकसन कार्यक्रम म्हणून हाती घेण्यात आला आहे.सदर उपक्रमाची संकल्पना जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची आहे.
कोविड १९ मुळे मुले शिक्षणापासून वंचित असल्याने मुलांचा “सद्याचा अध्ययन स्तर काय आहे?” हे बघण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात निवडक शाळांमध्ये दिनांक २० ऑगस्ट रोजी प्रारंभिक चाचणी-२०२१-२२ आयोजित करण्यात आली आहे.
त्याअनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी सभेला उपस्थितीतांना चाचणी संदर्भात सविस्तर माहिती दिली तथा मार्गदर्शन केले.सोबतच डॉ.जगन्नाथ कापसे जेष्ठ अधिव्याख्याता,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांनीही मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप,चाचणी कशी घ्यावी,प्रपत्र कसे भरायचे,लिंक मध्ये माहिती कशी भरावी? यावर प्रकाश टाकला.
त्याचप्रमाणे काही तांत्रिक अडचणींमुळे सभेला उपस्थित होता आले नसेल तर *https://youtu.be/QmQ1gYZYXbc* या लिंक वर क्लिक करून *फुलोरा प्रारंभिक चाचणी* संदर्भात सविस्तर माहिती पाहू शकता असे आवाहन संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी केले आहे
आज पार पडलेल्या ऑनलाईन यु ट्युब मार्गदर्शन सभेला हेमलता परसा(शिक्षणाधिकारी प्राथमिक,जिल्हा परिषद गडचिरोली)सर्व जेष्ठ अधिव्याख्याता,सर्व अधिव्याख्याता,सर्व गटशिक्षणाधिकारी,सर्व केंद्र प्रमुख,सर्व विषय सहाय्यक, सर्व विषय साधनव्यक्ती,निवडक शिक्षक, विशेषतज्ञ,संसाधन शिक्षक उपस्थित होते.