विवाहितेवर लग्नाच्या आठ दिवसानंतर अनैसिर्गिक अत्याचार:पतीविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल

0
1241

 

तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल : शहरातील विवाहितेला पतीकडून अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करीत येथील न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
.याबाबत माहिती अशी की, यावल शहरातीलएका परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते. लग्नाच्या आठ दिवसानंतर पतीला दारूचे व्यसन जडले.दारूच्या नशेत घरी येवून पत्नीशी अनैसर्गिककृत्य करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच विवाहितेने लव्हमॅरेज केले म्हणुन लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून आता दिवाळी करीता माहेरहून कार, रोख रक्कम व सोन्याची अंगठी आणावी या करीता विवाहितेचा छळ केला. विवाहितेला हा अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले. विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गर्शदनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अजमल खान पठाण, पोलिस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहे. त्यास अटक करीत येथील न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here