शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरातच आढळला.

0
230

 

SURYA MARATHI NEWS

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली असून व त्याचे नाव डॉ. अशोक पाल असे आहे. व या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातच ही हत्या करण्यात आलीय. व बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली असून हत्येचे नेमके कारण काय हे अद्याप अद्याप समजू शकलेले नाही.
महाविद्यालयाच्या परिसरातच हत्या
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अशोक पाल मागील काही दिवसांपासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होते. मात्र बुधवारी मध्यरात्री त्यांची अमानुषपणे हत्या झाली. ही हत्या अज्ञात व्यक्तीने केली असून शिकाऊ डॉक्टरचा मृतदेह महाविद्यालयाच्या परिसरातच आढळला. सदर या घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सुरु केलाय.
महाविद्यालय प्रशासन, डीनविरोधात घोषणाबाजी शिकाऊ डॉक्टरची हत्या का झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, हत्या प्रकरणानंतर रुग्णालय परिसरात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाविद्यालय प्रशासन व डीनविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केलं असून राज्यत एकच खळबळ उडाली आहे. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेवर प्रश्न विचारला जात आहे.
आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एकाद्यार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू झाला होता. स्वप्नील शिंदे असं या मयत डॉक्टरचं नाव होतं. मृत विद्यार्थी डॉक्टर स्वप्नील शिंदे याने याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच या विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचारदेखील सुरु होते. तर दुसरीकडे आमच्या मुलाचा मृत्यू हा रॅगिंगमुळेच झाला आहे, असा आरोप मृत डॉक्टरच्या नातेवाईकांनी केला होता. व या प्रकरणामध्ये एक सुसाईड नोटदेखील आढळून आली होती. सुसाईड नोटमध्ये मला काही वरिष्ठ मुलींचा त्रास होता असे मयत डॉक्टरने नमूद केलं होतं. पुढील तपास सुरु आहे. Surya marathi news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here