शेतकरी लाभार्थ्याचे शासकीय अनुदान बँक व्यवस्थापकांनी कर्ज खात्यामध्ये कपात करू नये तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी,भारतीय जनता पार्टी च्या वतीने तहसीलदारांकडे मागणी:

0
317

 

प्रतिनिधी:(जालना)दिनांक-१७/१०/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर केली आहे.या निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की,जालना तालुक्यातील रामनगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया व इतर काही बँका शेतकरी लाभार्थ्याची अनुदान कर्ज खात्यामध्ये कपात करीत असून,संबंधित बँक व्यवस्थापनाला लाभार्थ्याच्या खात्यामधील रक्कम कपात न करण्याच्या सूचना द्याव्यात व शासकीय अनुदान लाभार्थ्याच्या खात्यामध्ये तात्काळ वितरित करावे.तसेच मागील पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये हाहाकार माजवला असून,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन,कापूस,मका,तुर,द्राक्ष इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान,मदत जाहीर करुन वितरित करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जालना तालुक्याचे वतीने होत आहे.या निवेदनावर संजय डोंगरे,अनिल सरकटे,तुकाराम राठोड,गजानन नरवडे,शिवाजी राठोड,गजानन उगले,राजू राठोड,विकास कदम,लक्ष्मण राठोड,विष्णू राठोड सह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here