लोणार/जगन मोरे
लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील अडवलेला शेत रस्त्याची मागील वर्षी मोका पाहाणी झाली आहे तरी सदर रस्ता लवकरात लवकर खुला करून द्यावा अशी मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे यांनी तहसिलदारांना निवेदन दिले असल्याची माहिती 9 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे
चिंचोली सांगळे येथील गट नंबर 318 ते गट नंबर 270 पर्यंतचा संपूर्ण रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेला आहे या दोन्ही गटांमधुन जाणारा शेत रस्ता नकाशाप्रमाणे सरकारी आहे सदर रस्त्यावरून किमान 50 ते 70 शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतामध्ये जनवारे, बैलगाडी, पेरणीसाठी खते बी-बियाणे, इतर शेती संबंधी अवजारे,नेण्यास शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याची मागील वर्षी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पाहणी झालेली आहे यावर्षी सदर रस्ता मोकळा करून रसत्याचे पांदन रस्ता योजनेमध्ये समावेश करून रस्ता करून द्यावा ही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष संजय चाटे सह या शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


