Home Breaking News श्रीराम टॉकीज जवळील साई ज्वेलरीचे दुकान चोरट्यांनी लुटले

श्रीराम टॉकीज जवळील साई ज्वेलरीचे दुकान चोरट्यांनी लुटले

0
378

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट : येथील श्रीराम टॉकीज जवळील नगर पालिका कॉम्प्लेक्स मधील श्री साई ज्वेलर्स या प्रतिष्ठान मध्ये काल मध्यरात्री धाडसी चोरी झाली . यात सुमारे तीन लाख 52 रुपयांचे सोन्या चांदीचा दाग दागिने चोरट्यांनी लंपास केला .
चोरट्यांनी दुकानाचे टीनेचे शेड तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील दोन लाख रुपये किमतीचे 50 ग्राम सोन्याचे दागिने , 6 ग्राम सोन्याची मोड किंमत 30 हजार रुपये आणि दीड किलो चांदी किंमत 82 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला .या दुकानाचे संचालक सोमनाथ लोंढेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची तक्रार नोंदविली आहे . विशेष म्हणजे या चोरट्यांनी आजू बाजूचे तीन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला व चोरट्यांच्या हातात ज्वेलरीचे दुकान लागल्याने त्यांनी या दुकानात लुट करून पळ काढला . हे कॉम्प्लेक्स मध्यवस्तीत असून दिवसरात् या परिसरात आवागमन सुरु असते,मागील काही महिन्यात शहरात चोरीची मालिका सुरु असून पोलीस चोरट्यांपर्यंत अद्याप पोहचू शकलेले नाही .त्यामुळे व्यापारी त्यामुळे शहरवासीयांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे,या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संपत चव्हाण करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here