लाडणापूर येथे कोरोना काळात आई /वडील गमावलेल्या मुलांच्या सोबत संग्रामपूर मित्र परिवार आणी विभागीय अधिकारी वैशाली ताई देवकर, पि एस आय भूषण गावंडे साहेब , संग्रामपूर मित्र परिवाराचे शंकरराव पुरोहित, मेजर प्रभूदास सपकाळ साहेब, पि. एस. आय. आशीष मोरखडे साहेब, डॉक्टर प्रविण पाटील साहेब, डॉक्टर महाजन साहेब,गटशिक्षणाधिकारी ढगे साहेब, सामाजिक कार्यकर्ते राजेश लहासे,पी.एस.आय. विखे साहेब, डॉक्टर अंभोरे साहेब, सरपंच मानकर ताई, तसेच ज्यांच्या प्रयत्नाने कार्यक्रम आयोजित केला होता ते सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जामोदे भाऊ.
एकूण १९ मुला मुलींना दिवाळीच्या निमित्ताने संग्रामपूर मित्र परिवाराचे शंकरराव पुरोहित यांचे कडून रेडीमेड ड्रेस , पी.एस.आय. आशिष मोरखडे यांचे कडून श्वेटर , प्राध्यापक हरीभाऊ तायडे सर यांचे कडून कानटोपी आणि मोजे जोड, गटशिक्षणाधिकारी ढगे साहेब यांचे कडून पेढे आणि मिलींद सोनोने यांचे कडून दिवाळी फराळ इत्यादी वस्तू चे वाटप करण्यात आले. डॉक्टर प्रविण पाटील साहेब यांनी या मुलांना त्यांच्या अकोला येथील त्यांच्या ओम हॉस्पिटलमध्ये उपचार मोफत करण्यात येतील असे सांगितले, राजेशजी लहासे यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून प्रत्येक मुलाला ११०० रुपये महिना लागू होण्याकरिता अर्ज भरून घेतले,
कार्यक्रमाच्या स्थळी मेजर प्रभूदास सपकाळ साहेब यांच्या कडून कु. आचल राजू सोनोने हिचे पालकत्व स्विकारून तिच्या भविष्यातल्या सोयी करीता २५००० रूपयांचा धनादेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागीय अधिकारी वैशाली ताई देवकर होत्या, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी ढगे साहेब यांनी केले, राजेश लहासे तसेच डॉक्टर प्रविण पाटील साहेब यांनी आपले विचार मांडले.
विभागीय अधिकारी वैशाली ताई देवकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की या मुलांच्या भविष्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सर्व योजनांचा लाभ दिला जाईल असे सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला असंख्य गावकरी आणि संग्रामपूर मित्र परिवाराचे सदस्य वैभव गायकी अतुल वानखडे, मोहन उकर्डे व शिक्षण विभागाच्या वतीने भाऊराव बांगर सर, दिनेश तायडे सर हे आणि पत्रकार बांधव हजर होते.
कार्यक्रमाचे संचालन मिलींद सोनोने यांना तर आभारप्रदर्शन शाम कौलकार यांनी केले.
कार्यक्रमाला लाडणापूर आणि परीसरातील मान्यवरांची उपस्थिती होती.