संग्रामपूर शहरात भगत प्लास्टिक यांचे कंत्राट सुरळीत चालू ठेवा -600 नागरीकांनी सह्या करून दिले मुख्याधिकारी यांना निवेदन

 

संग्रामपूर शहरात भगत प्लास्टिक द्वारे होत असलेल्या घनकचरा व व्यवस्थापन काम योग्य व्यवस्थितरित्या चालू असण्याबाबत संग्रामपूर शहरातील 600 नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
गेल्या 21ऑगस्ट 2020 पासून संग्रामपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम भगत प्लास्टीक यांना नगरपंचायत अंतर्गत देण्यात आले आहे त्या दिवसापासून संग्रामपूर शहराचा कायापालट झालेला आहे.सर्वीकडे भगत प्लास्टिक आणि त्यांनी नेमलेल्या सफाई कामगारांची वाह वाह होत आहे.नगरपंचायत आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापनाचे अपेक्षेपेक्षा जास्त काम होताना दिसत आहे.सर्व कामे पाहता भगत प्लास्टिक आणि त्यांचे सफाई कामगार यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.संग्रामपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी भगत प्लास्टीक यांचे खूप प्रयत्न चालू आहेत आणि नागरिक देखील त्यांना सहकार्य करत आहेत.परंतु काही नगरसेवक टेंडर रद्द करण्याचे निवेदन देत आहेत त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी संग्रामपूर शहरातील नागरिकांचे नुकसान होत आहे तसेच भगत प्लास्टिक आणि त्यांच्या सफाई कामगारांनी स्वच्छतेबाबत शहरात जनजागृती करून एकप्रकारे सामाजिक बांधिलकी निर्माण केली आहे.विशेषतः तहसीलदार संग्रामपूर,सिव्हिल जज,तालुका वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक तामगावं पो.स्टे.,तालुका कृषी अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया,बँक ऑफ महाराष्ट्र यांनी देखील भगत प्लास्टिक यांच्या कामाची दखल घेता घनकचरा व्यवस्थापनाचे काम चांगल्याप्रकारे चालू असल्याचे पत्र मुख्याधिकारी यांना देण्यात आले

वरील सर्व बाबींचा विचार करून मा.मुख्याधिकारी यांनी संग्रामपूर शहरात नगरपंचायत अंतर्गत भगत प्लास्टिक यांचे काम योग्य आणि व्यवस्थितरित्या चालू असल्याने त्यांचे कंत्राट रद्द किंवा स्थगित न करता सुरळीत चालू ठेवण्यात यावें असे शहरातील 600 नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन नगरपंचायत मुख्याधिकारी यांना तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्स चे पालन करून देण्यात आले.निवेदनात शहरातील प्रतिष्ठित नागरिक,नगरसेवक,डॉक्टर वर्ग,व्यापारी वर्ग तसेच प्रत्येल वार्डातील नागरिकांच्या सह्या आहेत

Leave a Comment