यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे
जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी काल आपल्या पदभार स्वीकारला असुन यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांशी व सामाजीक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधताना पहुर पोलीस ठाण्याचे हद्दीत कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य व गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची मदत घेणार असून त्यात सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, पत्रकार व सामान्य नागरिक यांचे सहकार्य लाभणार आहे, सर्व सामन्य नागरिक , महिलांवर होणारे अन्याय,तसेच गुन्हेगारीवर पुर्णतः नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असतांना पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना संसर्गाच्या काळात केलेली कार्यवाही जिल्ह्यात लक्ष्णीय ठरली होती .

