छत्रपती शिवाजी महाराज हे बारा बलुतेदार यांचे राजे आहेत तसेच त्यांच्या काळात जनतेस कधीच अडचण आली नाही. ते एक उत्तम राजकारणी होते एवढे मोठे राजकारणी आता होणे नाही पण त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. असा संकल्प ताईंनी शिवजयंती दिनी घेतला आहे. सौ. नंदाताई पाऊलझगडे यांनी त्यांच्या निवासस्थानी पारंपरिक शिवजयंती चा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास रोकडीया नगर येथील महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम पूर्ण झाल्या नंतर ताईंनी शेगाव तालुका व परिसरातील महिलांना व नागरिकांना येणाऱ्या समस्या त्या स्वाता सोडविण्याचा प्रयत्न करेल असे आवाहन ताईंनी नागरिकांना केले आहे सामान्य जनतेचे सर्वच प्रकारच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करून त्यांना चिंतामुक्त करण्याचा आगळा वेगळा संकल्प ताईंनी शिवजयंती दिनी घेतला आहे.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


