अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)
खामगाव पोलिसांची कामगिरी
दोघांना अटक
कारने नकली नोटा घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी बुधवारी रात्री सिनेस्टाईलने पकडून अटक केलीआहे. कुणाला तरी फसविण्यासाठी मोठी डील होणार असल्याची माहिती खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षकांना मिळाल्यावरून खामगाव शहराजवळ सापळा रचून भरधाव जाणाऱ्या कार चा पाठलाग करून हि कारवाई केली. या कारवाई नकली आणि चलनी अश्या एकूण ६१ लाखांच्या चलनीनोटा पकडल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरुन नकली नोटांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती खामगांव पोलीसांना मिळाली. यावरुन खामगांव पोलीस विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना मिळाल्यावरून अकोला महामार्गावर वेगवेगळी पथके तयार करुन सापळा रचन्यात आला. यावेळी पोलीसांना अकोला वरुन एमएच ३० एएफ ४२९५ ही कार नकली नोटा घेऊन येत असल्याची खात्री पटताच पोलीस पथकाने टेंभूर्णा फाट्यापासून कारचा पाठलाग सुरु केला. मात्र कार चालकाला पोलीस मागे लागल्याचे समजताच त्याने भरधाव वेगाने वाहन पळवीत बाळापुर नाका मार्गे शहरातील सुदर्शन चौकात एकास कारमधून उतरवून दिले. तर कार चालकाने भरधाव वेगाने कार घेवून बाळापूर फैल, रेखा प्लॉट, बर्डे प्लॉट मार्गे भरधाव वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सती फैल, बर्डे प्लॉट भागातून कार सजनपूरी कडे नेत असताना एका दाम्पत्यास उडविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीसांनी कारचा पाठलाग सुरुच ठेवित सदर कार शिरसगांव देशमुख परीसरात पकडून वाहन ताब्यात घेतले. तर दुसऱ्या आरोपीस नागरिकांनी पोलीसांच्या स्वाधिन केले.
अनिल भिकाजी हिरोळे वय 42 वर्ष रा. गजानन कॉलनी खामगांव आणि अशोक मोरे वय 59 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या कारवाई पोलिसांनी त्यांचे कडून त्यांचे ताब्यातील टाटा विस्टा गाडी क्रं . MH 30 – AF- 4295 हे वाहन, व एकूण 11 हजार 775/- बनावट नोटा ज्याचे मुल्य 61.65,300 /- रु.चा माल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.







