देवरी ‘-चिचगड मार्गावर खड्डे च खड्डे

 

 

शैलेश राजनकर. गोंदिया प्रतिनिधि

केंद्र व राज्य शासन रस्ते नवीनीकरणासाठी विविध योजनांतर्गत कोटय़वधीचा निधी देतात. मात्र हा निधी रस्यांवरील खड्ड्यांमध्ये जात असल्याचे निदर्शनास येते. देवरी- चिचगड मार्ग हे त्याचेच उदाहरण असुन रस्त्यावर खड्डे की खड्डयात रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.
देवरी शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक. ६ वर असुन तालुका, पंचायत समिती, कृषी, शिक्षण , प्रकल्प, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधीक्षक आदी महत्त्वापूर्ण कार्यालयांसह आठवडी बाजार व नगरपंचायततीचे ठिकाण आहे.
त्यामुळे तालुक्यातून दररोज हजारो नागरिकांची वद्ळ असते. चिचगड परीसरातुन येणाऱ्या नागरीकांना रस्त्यावरील खड्ड्यामध्ये लहान-मोठे अपघात नेहमीच झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी जन प्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे,
त्यामुळे नागरिकांना शेष व्यक्त होत असुन रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून लवकरात लवकर नूतनीकरण करण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Comment