यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
संपुर्ण राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या महामारीने जळगाव जिल्ह्यात मोठया प्रमाणावर बाधीत रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत असुन , आरोग्य प्रशासन हे रूग्णांच्या सेवेसाठी अधिक सज्ज व सर्तक झाले असुन , या पार्श्वभुमीवर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी रावेर यावल तालुक्यातील कोवीड रूग्णांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या वतीने भावनिक आवाहन केले आहे . मोठया प्रमाणावर रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असुन , कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सीजन बेड अभावी मोठया प्रमाणावर उपचाराअभावी भटकंती होत असुन, प्रसंगी अनेक रूग्णांना आपला जिव गमवावा लागत असुन , यासाठी प्रशासनाने लोकसहभागातुन ५० ऑक्सीजन बेडच्या कोवीड सेन्टर ची उभारणी करण्यात येत असुन, फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या आवहानास प्रतिसाद देत साठी आज यावल नगर परिषदचे नगरसेवक प्रा . मुकेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते , नगरसेवक असलम शेख नबी , नगरसेवक अभीमन्यु (हेन्द्री ) चौधरी , उपनगराध्यक्ष रुख्यमाबाई भालेराव ( महाजन ) , नगरसेविका सौ . देवयानी धिरज महाजन , नगरसेवक समीर शेख मोमीन यांनी आपल्या वतीने तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांची भेट घेवुन ७६ हजार रूपयांची रोकडा मदत त्यांच्या स्वाधीन केली. यावेळी महसुल प्रशासनाच्या वतीने दानसुर नागरीकांनी व सामाजिक संघटनांनी रुग्णसेवेसाठी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे .







