यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे
तालुक्यातील किनगाव खुर्द ग्रामपंचायती कडून दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजुर झालेल्या निधीतुन दलीत वस्ती सोडून दुसरी कडेचं कामे केली जात आहे अशी तक्रार पंचायत समिती कडे पीआरपी कडून करण्यात आली असुन कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे
येथील पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्या कडे पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे यावल तालुकाध्यक्ष राहुल बापू साळुके व जिल्हा उपाध्यक्ष रतन रमेश वानखेडे यांनी दिलेल्या निवेदना नुसार किनगाव खुर्द ता. यावल ग्रामपंचायती कडे सुमारे २० लाखांचा निधी हा दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त झाला आहे तेव्हा या निधीतुन दलीत वस्तीत विविध विकास कामे होणे आवश्यक होते मात्र, सदरची कामे ही फक्त कागदावरच असून प्रत्येक्षात जुन्या कामावर डागडूगी सुरु आहे. तसेच सदर काम दलीत वस्तीत न करता इतर ठिकाणी सुरू आहे. तेव्हा या कामांची त्वरित चौकशी होऊन काम थांबविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तेव्हा आठवड्याभरात चौकशी न केल्यास पंचायत समितीवर मोर्चा आणून जन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.-पुर्ण—फोटो आहे







