सचिन जगताप यांची नासिक महसुल विभागातुन ई-फेरफार व ई-चावडीच्या प्रकल्प स्थायी समितीवर निवड

0
431

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव येथे मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले कार्यतत्पर व अभ्यासु व्यक्तिमत्व शिस्तप्रिय अधिकारी सचिन जगताप यांची ई -फेरफार स्थायी समितीचे राज्य समन्यव्यक रामदास हरिभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वयक महासंघ समीतीचे प्रदेश अध्यक्ष शाम जोशी यांनी ई-फेरफार व ई-चावङी प्रकल्प स्थायी समिती वर नासिक महसूल विभागातून मंडळ अधिकारी संवर्गातून सचिन जगताप यांची निवड करण्यात आली आहे .मा. जमाबंदी आयुक्त यांचे निदर्शनाप्रमाणे ईर्‍ फेरफार प्रणालीत देण्यात आलेल्या
सुविधा या पुढे होणाऱ्या सुधारणा आणि काळानुरूप आवश्यक वाटणारे तसेच जनतेला अचूक,
तत्पर व पारदशी सेवा देण्यासाठी तसेच तलाठी मंडळ अधिकारी व अन्य वापरकर्ते यांचे कामात
आवश्यक अशी सुलभता येण्यासाठी करावे लागणाऱ्या बदलांचा अभ्यास करून त्याची उपयुक्तता
आणि सुसंगता तपासून त्या लागू करण्यासाठी तशी शासनाला शिफारस करण्यासाठी जमाबंदी
आयुक्त व संचालक भूमी अमिअभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली ई-फे रफार व ई-
चावडी प्रकल्प स्थायी समित्या करण्यात आल्या असुन , दरम्यान महाराष्ट्र शासनच्या महसुलव विभाग जमावबंदी आयुक्त आणी संचालक अभी लेख विभागाअंतर्गत झालेल्या समितीच्या निवडीबद्दल फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी , यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष दिपक गवई यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी यांनी सचिन जगताप यांच्या निवडीचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्यात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here