यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
येथे तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने केन्द्रातील ओबीसी समाज आरक्षण रद्द करण्यामागे देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी व राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हेच जबाबदार असुन , देशाच्या सर्वाच्च न्यायालयाने केन्दातील भाजपाच्या सत्ताधारी शासनाकडुन ओ बी सी समाजाची आकडेवारी मागितली होती परन्तु ती आकडेवारीची माहीती देण्यास केन्द्र शासन अपयशी ठरल्याने देशातील ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वाच्च न्यायालयाने रद्द केले असुन , या ओ वी सी समाजाच्या आरक्षण रद्द करण्यास महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणी केन्द्रातील नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असुन , दरम्यान आज यावल येथील बुरूज चौकात राजश्री छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती निमित्ताने काँग्रेसच्या तालुका कमेटीच्या वतीने सामाजीक न्याय दिनाचे औचित्य साधुन ओबीसी समाजाच्या न्याय हक्क मिळावे या करीता सकाळी ११ वाजता केन्द्रातील भाजपा सरकारच्या निषेर्धात जनआंदोलन आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील व तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल जंजाळे , हाजी गफ्फार शाह , नगरसेवक मनोहर सोनवणे , पुंडलीक बारी , युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईम्रान पहेलवान, नदीम शेख मोमीन , अविनाश बारी , अजय रामकृष्ण बढे , राजु बारी नावरेचे माजी सरपंच समाधान पाटील , कॉंग्रेस आदीवासीआघाडीचे बशीर तडवी , कलीम खान , विक्की गजरे , उस्मान खान यांनी या आंदोलनात सहभाग घेतला .







