प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक शिंदे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे व तालुकाप्रमुख मनीष देवडे यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांना विविध शेतकरी समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.hingnghatnews
या निवेदनाद्वारे हिंगणघाट तालुक्यासह संपूर्ण देशातील शेतकरी बांधवांच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. सध्या शेती हंगामाची सुरुवात होत असून मान्सूनपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत.
ट्रॅक्टर, पंप, जनरेटर तसेच विविध शेती उपकरणांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे.
मात्र जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप चालकांकडून कॅन व ड्रममध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दिनांक २१ मे २०२६ रोजी इंडियन ऑइल कंपनीकडून वितरकांना इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे पत्र देण्यात आले.wardhanews
असून शासनाकडूनही इंधन तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना कॅन किंवा ड्रममध्ये डिझेल नाकारले जात असल्याने संताप व्यक्त करण्यात आला.farmernews
“शेतीतील बहुतांश यंत्रसामग्री ही थेट शेतामध्ये असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मशागतीची साधने पेट्रोल पंपावर आणायची काय?” असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला केला.petrol
शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या शेतीकामात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित पेट्रोल पंप चालकांना तात्काळ स्पष्ट निर्देश देऊन शेतकऱ्यांना कॅन व ड्रममध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सदैव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Farmernews निवेदन देताना प्रकाश आनसने, शंकर मोहम्मारे, शितल चौधरी, गजानन काटोले, हिरामण आवारी, सचिन पोटदुखे, अनंता गलांडे, राहुल मोहितकर, किशोर इंगोले, दीपक गायकवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.



