Home Breaking News तिवसा येथे शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या आशीर्वाद बार जवळील घटना;चार आरोपी...

तिवसा येथे शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या आशीर्वाद बार जवळील घटना;चार आरोपी अटक

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक)

अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बसस्थानक जवळील आशिर्वाद वाईन बार समोर रात्री 10.15 वाजता शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली, या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे,अमोल पाटील यांच्यावर या पूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता तर त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्या बाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता,या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी पसार झाला आहे
अमोल जनार्दन पाटील वय 38 रा.तिवसा असे मृतकाचे नाव असून तो शिवसेना शहर प्रमुख होता,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अमोल पाटील हा आपल्या एका मित्रा सोबत बार मध्ये दारू पिण्यास आशीर्वाद बार मध्ये आला होता,दरम्यान आरोपींनी अमोल पाटील यांच्या हत्येचा आधीच कट रचला होता,सुरवातीला आरोपींना अमोल च्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले,दरम्यान घटनेविषयी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रिता उईके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी वेगाने चक्र फिरवत काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली तर एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलिस निरीक्षण रिता उईके यांनी दिली,अटक केलेल्या आरोपी मध्ये संदीप रामदास ढोबाळे वय 42 वर्षे, प्रवीण रामदास ढोबाळे,प्रवीण उर्फ अविनाश एकनाथ पांडे वय 30 वर्ष, रूपेश उर्फ अंकुश रमेश घागरे वय 22 वर्ष राहणार सर्व तिवसा तर एक आरोपी गुणवंत उमप वय 30 रा. कमळापूर हा पसार आहेत, आरोपी विरुद्ध 302,143,147,148,149,
120 (ब),34 नुसार गुन्हे दाखल केले आहे