Home Breaking News मारहाणीची घटनेचा व्हायरल व्हिडिओ व पत्राद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार उघड...

मारहाणीची घटनेचा व्हायरल व्हिडिओ व पत्राद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार उघड !

 

सचिन वाघे वर्धा

दिनांक 7.7.21हिंगणघाट :– दुय्यम निबंधक कार्यालयात 6 जुलैला वकील स्वप्निल धारकर हे सर्टीफाईड कॉपी घेण्यासाठी गेले असता त्यांना शिविगाळ करीत कैचीने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुय्यम निबंधक श्री.धार्मिक हे धावून गेल्याने मोठा अनर्थ टळला. दुय्यम निबंधक श्री. धार्मिक यांना देखील जिवे मारण्याची धमकी शिपाई उमेश नवणागे नी दिली आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधक श्री धार्मिक अ‍ॅड. स्वप्नील धारकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शिपाई उमेश नवनागे याच्या विरोधात 294 ,324,504 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओ व पत्रामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आत मध्ये दलाल हे सक्रिय असतात या कार्यालयात वरिष्ठांकडून लक्ष देण्याची गरज आहे .