यावल सराफा दुकानात भरदिवसा दरोडा प्रकरण हे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी गांर्भीयाने घेतल्याचे सांगुन आरोपींचा शोध लागेल आ . चंद्रकांत पाटील

0
568

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील काल शहरातील सराफा दुकानात पडलेल्या दरोडया प्रकरणी आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दुकानास भेट दिली व दरोड्या प्रकरणी सराफा व्यापारी यांच्या कुटुंबांशी संवाद साधला व विविध विषयावर चर्चा केली. दरम्यान काल संपुर्ण यावल शहराला व तालुक्यास हादरून सोडणाऱ्या भरदिवसा पडलेल्या दरोडा व यातील लाखोंची लुट व या प्रकरणी घडलेले थरार या विषयाची आपण मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करीत असतांना यावल शहराचे शिवसेनाप्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या मालकीच्या सराफा दुकानावर पडलेल्या दरोडया विषयी माननिय जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी त्वरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर हा विषय टाकण्यात आला असुन, स्व:ताहा मुख्यमंत्री यांनी या विषयास गांर्भीयाने घेतले असुन या विषयी वरिष्ठ अधिकारी यांना त्यांनी त्वरित चौकशी करून तात्काळ आरोपींच्या शोध घ्यावा असे आदेश दिल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगीतले व सराफा व्यवसायीक कवडीवाले यांच्या कुटुंबास धिर दिला व सोन्याचे दागीने गेली याचा दुखः आहे पण सुदैवाने सोन्यासारखी आपली माणसे वाचली याचा आपण विचार करावा तसेच ज्या युवकांनी सराईत गुन्हेगारांना पकडण्याचा जो धाडस दाखवले त्यांचे विशेष कौत्तुक मुक्ताईनगरचे आमदार चंदकांत पाटील यांनी यावेळी सांगीतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here