महावितरण कंपनीच्या भोंगळ व हुकुमशाही पद्धत व शक्तीच्या विजवसुलीच्या विरोधात ग्रामीण सेवा फाउंडेशनचे उपोषण व मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना निवेदन

0
433

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या हुकुमशाही व भोंगळ कारभारामुळे आदीच कोरोना संकटामुळे सर्वसामान्य माणुस हा आर्थिक संकटात सापडला असुन , यात महावितरणाच्या कारभाराच्या विजवसुलीची सक्तीची सुरू असलेली मोहीमच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फौंडेशनचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष जलीलदादा सत्तार पटेल उपोषण करणार सध्या संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना काळ असल्याने सामान्य जनता शेतकरी, शेतमजूर,दलित, आदिवासी, या सहित सर्वच घटकांच्या लोकांना रोजगार नाही हाताला काम नाही त्यात इमाने इतबाराने काबाळ कस्त करून लोक पोट भरत असून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे काही अधिकारी आणि कर्मचारी हुकमशाही करून जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात दबंगगिरी करून सामान्य जनतेचे १०० टक्के विजबिल चे पैसे भरा अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कट करू असा दम भरत असून अनेक वर्षानुवर्षे नेहमी नियमित वीज भरणा करणाऱ्या जनतेचेही वीज कनेक्शन कट करत असून आणि वीज वेवस्थापणात अनिमियत्तता व वारंवार भारनियमन ( लोडशेडींग ) करून वीजबिल सक्तीची वसुली करून वीजबिल न भरल्यास विजकनेक्शन कट करण्याची धडक मोहीम राबवत असून या महावितरणाच्या गोंधळलेल्या मोहीमेत सर्व सामान्य जनता भरडली जात असून, अशा प्रकारच्या होत असलेली ही कार्यवाही त्वरीत न थांबल्यास आपण दि. २७ जुलै २०२१ मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या यावल येथील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे मा.सरपंच जलील सत्तार पटेल यांनी दिला असुन , या संदर्भातील माहीती ही निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्य
ऊर्जामंत्री ना नितिन राऊत ( महाराष्ट्र राज्य ) तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र नानाजी पटोले यांना पाठविण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here