साकळी येथे पोलीसांनी टाकला जुगार अड्डयावर छापा १५ जणांना ८८हजार रूपयांच्या रोकडसह घेतले ताब्यात

0
1060

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथे एका जुगार अड्ड्यावर यावल पोलिसांनी छापा टाकत १५ जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून तब्बल ८८ हजाराचा मुद्देमाल जुगारीचे साहीत्य हस्तगत करण्यात आले आहे. पोलीसांच्या वतीने ही सदर ची कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. यावल तालुक्यातील
साकळी येथे मंगळवारी सायंकाळी गावातील सार्वजनिक ठिकाणी जुगार अड्डा चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली होती तेव्हा त्यांनी सदर ठिकाणी कारवाई करण्यासाठी सहायक फौजदार मुजफ्फर खान, पोलीस अमलदार सुशील घुगे, पोलीस अमलदार राजेश वाडे यांच्या पथकास पाठवले तेव्हा सदरील ठिकाणी छापा टाकून खालिक शेख, अहमद शाह, अनिल चौधरी, लतीफ तडवी, अल्लाउद्दीन शेख, असलम खान, चंद्रकांत जंजाळे, सरफराज तडवी, सुपडू तडवी, शेख अशपाक, किशोर खेवलकर, जाबीर शेख, जुम्माह तडवी, जाबीर तडवी व शेख जाकीर अशा एकुण पंधरा जणांना जुगार खेळतांना पकडण्यात आले तर कारवाई दरम्यान बबन पाटील रा. मनवेल हा फरार झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडुन सांगण्यात आले. तेव्हा या पंधरा जणांकडून ८८ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या सर्वांविरुद्ध यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संजय देवरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here