शास्त्री वार्ड येथे 75 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

0
379

 

हिंगणघाट शास्त्री वार्ड येथे फिटनेस क्लब व चावडी स्वयं सहाय्यता बचत गट बालाजी दाल मिल च्या मागे
15 ऑगस्ट निमित्त देशभक्ती गीते, कारगिल युद्ध सर्वधर्मसमभाव यावर लघु नाटक, मनोरंजनात्मक,कार्यक्रम घेण्यात आले कार्यक्रमातून आजच्या युवा पिढीला आपल्या देशातील सैनिकांनी केलेले बलिदान व देशासाठी सर्वधर्मसमभाव ही भावना जागृत करणे हे लघुनाट्य च्या माध्यमातून सादर करण्यात आले संतोष करपे माजी सैनिक यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व मोलाचे मार्गदर्शन केले . आजच्या युवा पिढीने जाती-धर्माचे राजकारण न करता सर्व धर्म समभाव याच गोष्टीचा विचार केला पाहिजे आपले सैनिक देशासाठी, आपल्यासाठी देशाचे रक्षण करतात व आपण धर्माच्या नावावर एक मेकाचे रक्त सांडवतो अशा कार्यक्रमा चे आयोजन करणे आज अत्यंत आवश्यक आहे .
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन चावडी बचत गटाचे अध्यक्ष राजू धात्रक, उपाध्यक्ष सुधीर सावकार,, सचिव नीलकंठ आष्टनकर, सदस्य विलास खडसे, प्रदीप सायंकार, फिटनेस क्लब चे वेदांत आष्टनकर सुमित सावकार , यश खडके, प्रदीप शाहू, बालू कोरटकर , यांनी केले हा कार्यक्रम वार्डातील लोकांनी उपस्थित राहुल 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला .
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here