यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील किनगाव येथील राहणाऱ्या एका तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत यावल पोलीसात अवसमात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातीत किनगाव गावात दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ , १५ वाजेच्या सुमारास दगडु यादव धनगर या २६ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरातील मागच्या खोलीत रात्री २ वाजताच्या सुमारास झोपला असता घरातीत सुतळी पटयाने घराच्या छताला असलेल्या लाकडी दांडयाला बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . या घटनेची खबर सचिन रामकृष्ण धनगर वय३६ वर्ष राहणार किनगाव यांने दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . तरूण दगड्ड धनगर याने आत्महत्या केली याचा स्पष्ठ कारण कळाले नसले तरी काही दिवसांपासुन त्याचे मानसीक संतुलन बिघड्ल्याचे कळाले असुन यातच त्याने आत्महत्या केली असावी असा कयास आहें.
.

