Home Breaking News नांदगाव तालूका प्रहार शेतकरी संघटनेकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

नांदगाव तालूका प्रहार शेतकरी संघटनेकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

0
316

 

प्रतिनिधी, सचिन पगारे
नांदगाव (नाशिक)

चार ते पाच दिवस चालणार्‍या संततधार पावसामुळे घाटमाथा परिसरातील कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेने या परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
तालूक्यातील घाटमाथा परिसरात संततधारेमुळे झालेल्या कपाशी पिकांची पाहणी करण्यासाठी नांदगांव प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बोलठाण, जातेगांव, लोढरा, ढेकू परिसरात जाऊन नुकसानीचा आढावा घेऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या असता.चार ते पाच दिवस चालणार्‍या पावसामुळे कपाशी पिके पूर्णतः सूकून गेली आहेत. शेतकर्‍यांवर आलेल्या या अस्मानी संकटामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासन व पिक विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळावी या आशेत आहे. परिसरात प्रशासनाकडून व विमा कंपनी प्रतिनिधींकडून अजूनही नुकसान झालेल्या कपाशी पिकांची पाहणी झाली नाही व पंचनामेही झाले नाही असे दिसून आले.यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित राहत आहे.विमा कंपनीला पिक नुकसानीची तक्रार आॅनलाईन दाखल केलेल्या बर्‍याच शेतकर्‍याच्या नुकसानीचे पंचनामे विमा कंपनीकडून अजूनही झालेले नाही.तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यातील बर्‍याच शेतकरीवर्गाला तक्रार दाखल करणे शक्यही नाही .प्रहार संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी सांगितले की, प्रशासकीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना विनंती आहे की, प्रशासनाने कृषी सहायक तलाठी व विमा कंपनी प्रतिनिधींनी सदर परिसरात लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करावी.नूकसानीसंदर्भात आकडेवारी जाहीर करुन शासनाला माहिती पूरवावी व शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पाठपुरावा करावा. ज्या प्रमाणे शेतकर्‍यांना नुकसानीचा फायदा मिळण्यासाठी प्रशासन व पिक विमा कंपनीकडून विमा भरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. तसेच अनेक वंचित शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना प्रशासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी.प्रशासनाकडून विमा कंपन्यांना पंचनाम्यांचे आदेश देऊन अंतिम शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.*
प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी तालूक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांना विनंती केली की, एक हक्काचे लोकप्रतिनिधी म्हणून या हंगामातीलही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या या प्रश्नात विशेष लक्ष घालून प्रशासनाला पाठपूरावा करावा .येत्या दोन तीन दिवसांत सर्वच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठीही पाठपुरावा करावा.
कोणत्याही विमा कंपनीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची टाळाटाळ केल्यास संबंधित विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी तालूक्यात फिरु देणार नाही.कृषीसहायक, तलाठी यांनी नूकसानग्रस्त भागातील नूकसानीबाबत अहवाल प्रशासनाला तत्काळ पाठवावा.अशा प्रकारे प्रहार शेतकरी संघटनेकडून आवाहन करण्यात आले.यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, उपाध्यक्ष चंद्रभान झोडगे, जातेगांव शाखा अध्यक्ष जनार्दन भागवत,संपर्क प्रमुख ईश्वर जाधव, रविकांत भागवत, राहूल पवार, तसेच प्रहार सेवक व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here