Home वर्धा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांनी कुटकी येथील शेतात केली अँपवर ई पिक नोंद

उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांनी कुटकी येथील शेतात केली अँपवर ई पिक नोंद

 

महाराष्ट्र शासनाचा माझा सातबारा माझी पिकनोंद, ई पिक पाहणी मोहिमे अंतर्गत हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांनी शेतकऱ्यांना स्वतः पिकाची नोंद करता यावी याकरिता कुटकी येथील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ऍपचे प्रत्यक्षिक करुन दाखविले यावेळी घोडमारे उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट,मेश्राम तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट, समाशेर पठाण नायब तहसीलदार हिंगणघाट, संजय भोंग मंडळ अधिकारी अल्लीपूर, तलाठी दिपक अंधारे, अभिष रामटेके, कृषिसहाय्य्क कु. पवळ सरपंच माधुरी बोभाटे शेतकरी श्रीकांत महाजन, कृषीमित्र कापसे आणि गावकरी उपस्थित होते. या उपक्रमाचा पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या शेतातील पिकांची नोंद अपद्वारे स्वतःच करावी असे आव्हान उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी शेतकऱ्यांना केले
सूर्या मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा