Home लातूर निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस, दोन शेतकरी गेले वाहून

निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस, दोन शेतकरी गेले वाहून

 

दगडू पिंगळे निलंगा प्रतिनिधी

निलंगा तालुक्यातील मदनसुरीसह सबोतालच्या परिसरातील रामतीर्थ, अंबुलगा (वि), हाडोळी, रामलिंग मुदगड, हत्तरगा (हा) इत्यादी ठिकाणी दुपारपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढे, नदी-नाले भरून वाहत आहेत. या पावसामुळे मदनसुरीतील ओढ्याला मोठा पूर आला आणि हा ओढा ओलांडत असताना संजय माने व शैलेश माने या दोन शेतकऱ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेले. मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला.