अर्जुन कराळे शेगांव प्रतिनिधि
शेगाव: एका अनोळखी महिलेचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे ट्रॅकमेंन नंदन मनोहर शेगोकार वय २४ वर्षे यांनी त्यांच्या सुपरवायजर राजेश मीना यांना सांगितल्यानुसार त्यांनी शेगांव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीनुसार पोल नंबर ५५१ (२-४) डाऊन लाइन नागझरी गेट जवळील नालीमध्ये एक अनोळखी महिला मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता सुमारास पडलेली दिसून आली आणि त्या महिलेची कवटी फुटलेली आहे. सदर मृतावस्थेतील महिलेच्या अंगात ग्रे रंगाचे फूल बायाचे शर्ट त्याखाली जांभळे हाफ बायांचे टॉप त्याखाली पिवळ्या रंगाचे लॅगिन, उजव्याहाताच्या मधल्या बोटात पांढऱ्या धातूची अंगठी त्यावर आकाशी रंगाचा खडा, उंची अंदाजे ५ फुट ४ इंच, रंग गोरा, केस काळे अशा वर्णनाची महिला पडलेली आहे. अशा वर्णनावरून ओळख पटविण्याचे आवाहन शहर पोलीसांकडून करण्यात आले आहे. शहर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले हे करीत आहेत.







